पाचल, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
नोंदणी क्र: E-588 | राजापूर, रत्नागिरीज्ञान, संस्कृती आणि समाजसेवेचा दीर्घ प्रवास
पाचल हे राजापूरच्या पूर्वेकडील दुर्गम भागातील एक गाव. सध्या अंदाजे आठ हजार लोकवस्ती असलेले हे गाव, आजूबाजूच्या १५-२० गावांसाठी बाजारामुळे, सरस्वती विद्यामंदिर उच्च माध्यमिक शाळेमुळे आणि जवळच असलेल्या खापणे महाविद्यालयामुळे एक सांस्कृतिक केंद्र बनले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात कै. गोपाळ बा. नारकर उर्फ गोपाळ आबा हे गांधीजींच्या सहवासात राहिले होते. गांधीजींच्या "खेड्याकडे जा" ह्या आदेशाने त्यांनी बनारस विद्यापीठातील शिक्षण सोडून पाचलला परत आले. कै. आत्माराम रेडीज, कै. वि. म. लब्दे, कै. ज्ञानदेवभाऊ नारकर आदी सहकाऱ्यांसह ७ मे १९३७ रोजी ग्रामसेवा संघाची स्थापना केली. त्यांनी प्रथम वर्तमानपत्र-वाचनालय सुरू केले आणि नंतर "ग्राम वाचनालय पाचल" इ.स. १९४३ मध्ये सुरू झाले. सुरुवातीला सहकारी सोसायटीच्या व्हरांड्यात चालत असे.
पहिली पिढी वृद्ध झाल्यावर काही काळ वाचनालय निष्क्रिय राहिले. नंतर १४ एप्रिल १९७६ रोजी ग्रंथप्रेमींनी पुन्हा वाचनालय सुरू केले आणि कै. ज्ञानदेवभाऊ नारकर यांच्या स्मृतीस अर्पण म्हणून "कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय, पाचल" असे नाव दिले. कै. शांताबाई विजय नारकर (मातृमंदिर देवरुख) यांच्या साहाय्याने "बाल विभाग" सुरू झाला. कै. आत्माराम अण्णा रेडीजांनी सिद्धारूढ स्वामींच्या मठाजवळील आपली जागा विनाभाडे दिली.
वाचनालयाकडे सध्या सुमारे १५,०००+ ग्रंथ आहेत. दरवर्षी शासनाच्या परीक्षणात "अ" दर्जा मिळतो व जमा-खर्चाचे लेखापरीक्षण होते. पाचल, राईपाटण, करक, तळवडे व येळवण येथील वाचक नियमित येतात. सरकारी अनुदान अनियमित असल्याने "ब" वर्गातून "अ" वर्ग दर्जा मिळवणे आणि स्वतःच्या मालकीची जागा मिळवणे हे आमचे ध्येय आहे.
सर्व पंचक्रोशी "एम. बी. सर" म्हणून ओळखले जाणारे सरस्वती मंदिर शाळेचे माजी मुख्याध्यापक. सन १९७० साली त्यांनी वाचनालयाची अधिकृत नोंदणी राज्य शासनाच्या ग्रंथालय विभागाकडे केली. त्यांच्या अथक प्रयत्नांनी पुस्तक संख्या वाढली; शेतकरी व महिलांसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी गायन-चित्रकला-वक्तृत्व स्पर्धा राबवल्या; वाचनालय "क" वर्गातून "ब" वर्गात आले; इ.स. १९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट वाचनालय पुरस्काराने सन्मान झाला. ते २२ फेब्रुवारी २०२३ रोजी हृदयाघाताने निधन पावले — ते आमचे कायमचे प्रेरणास्थान आहेत.
वाचनालयातर्फे सदस्य व अभ्यागतांना दिल्या जाणाऱ्या सुविधा
१५,०००+ मराठी, हिंदी व इंग्रजी पुस्तके सदस्यांसाठी उपलब्ध आहेत.
२७ नियतकालिके व ७ दैनिक वृत्तपत्रे सदस्य व अभ्यागतांसाठी विनामूल्य.
सकाळी ९:३०–१:०० आणि दुपारी ३:००–५:३० वाजेपर्यंत वाचनालय खुले.
सध्या २५०+ सदस्य. पाचल, राईपाटण, करक, तळवडे, येळवण परिसरातून वाचक येतात.
शेतकरी प्रशिक्षण, महिला मेळावे, विद्यार्थ्यांसाठी गायन, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा.
इ.स. १९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर "उत्कृष्ट वाचनालय" पुरस्काराने सन्मानित.
आपल्या सहयोगाने हे वाचनालय अधिक समृद्ध होईल
वाचनालयास सरकारी अनुदान तुटपुंजे आणि अनियमित मिळते. त्यामुळे दैनंदिन खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित देणे कठीण होत आहे.
पुस्तक संख्या वाढवून आणि स्वतःच्या मालकीची जागा मिळवून "अ" वर्ग दर्जा प्राप्त करणे हे ध्येय आहे. आपल्यासारख्या दानशूर आणि सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्ती व संस्थांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
वाचनालयाच्या ऑनलाइन पोर्टलवर प्रवेश करा. आपले खाते उघडा, पुस्तके शोधा व सदस्यत्व जपा.
पोर्टलवर प्रवेश कराआपल्याला library.dnarkar.org — अधिकृत वाचनालय व्यवस्थापन पोर्टलवर पुनर्निर्देशित केले जाईल.